(+91) 9420480015
Welcome Guest  Login
सदर माहिती वीरशैव लिंगायत धर्माबाबत प्रकाशित झालेल्या विविध पुस्तके व लेखातून घेतली गेली आहे.
सदर माहिती बाबत काही आक्षेप असल्यास / माहिती दुरुस्त करावयाची असल्यास / अधिक माहिती द्यावयाची असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही आपले स्वागत करतो. X

-: श्री मव्दिरशैव पटट्णावळ (पट्टशाली) व कोष्टयांची उत्पत्ती :-

श्री परात्परदेव परशिव. नपरज्ञान ज्योति लिंगनव |
उपमे गैरपद ख्याति देवांग शंभूववनरसी ||
विपुल मनूर् मुनी देवदान गुपीत लिंग व नित्तु षट्स्थळ
नप दि बोधिसी वस्त्र यज्ञोपवित करूणिसिदा || १ ||

अर्थ: श्री परात्पर परमेश्वराचे अगाध ज्ञान ज्योतिर्लिंगच प्रसिध्द देवांग मुनीचा अवतार होऊन त्यांनी कैकु‚ मनू - मुनी‚ देव - दानव यांना आत्मलिंग आणि षटस्थळ ज्ञान देऊन त्यांना वस्त्र निर्माण करून दिले.

श्रुति: सदेव‚ सौम्य‚ इदमग्र आसी देवकमेवाव्दितीय् ब्रम्ह एकोऽहं बहुस्यां प्रजायेयामिती‚ लोकवत्तु लीला कैवल्य मित्यादि‚ हया आधाराने सॄष्टीचे पूर्वी काहीही नव्हते. त्यावेळ अनादी कालापासून सद्रुप ब्रम्ह एकच होते. त्या ब्रम्ह आत्म्याची शक्ती मायारूप होऊन मी एकटा आहे. अनंत होर्इन अशी इच्छा त्याला उत्पन्न झाली. या योगानें र्इश्वर हे जगत् सॄष्टीचे कारणात्मा होऊन त्यांच्यापासून अनंद देव‚ दानव‚ यक्ष‚ गन्धर्व इन्द‚ नारद‚ किन्नर‚ किंपुरूष‚ मनू - मुनी‚ मानव स्त्री-पुरूष‚ जाती विजाती‚ तिर्थक‚ कॄमी‚ कीटक‚ पशु- पक्षी‚ पिपीन्निका इत्यादि प्राणी उत्पन्न झाले. त्यावेळ इंद्रादिदेवगण व स्त्री‚ पुरूष लोक दिगंबर (विवस्त्र) होते. असे विवस्त्र रूपाने काही काळ लोटल्यावर एकदा नारदमुनी सॄष्टी निर्माण करणा-या र्इश्वरांच्या सभेमध्यें गेले. त्यावेळ सभेमध्यें ब्रम्हा‚ विष्णु, रूद्र इत्यादी सर्व लोक आपापले मान रक्षणाकरितां वटवॄक्षांची पाने लाऊन बसले होते. त्यावेळ नारदमुनीनी पाहिलेली सर्व परिस्थिती र्इश्वराला निवेदन करून प्रार्थना केली. हे जगदीश्वर! आपण जगदधिष्ठान होऊन उत्पत्ती - स्थिती - लयास कारणीभुत आहात. ञिलोकांतले सर्व लोक विवस्ञ आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सभेमधील देव दानव इत्यादी सर्व लोक विवस्ञ आहेत म्हणुन सर्व लोकांच्या मान रक्षणासाठीं एका महान व्यक्तिस निर्माण करावे. अशी प्रार्थना करून सभेमध्ये बसले, नारदमुनीचे हे भाषण ऐंकून सभेमधील सर्व लोक कांहीही न बोलता चुपचाप बसले होते‚ नंतर जगन्नियामक र्इश्वर एकाएकी योग निदेत राहिले. काही वेळा नंतर र्इश्वर जागा झाला. त्यावेळ र्इश्वरांचे पश्चिम शिखाचकामधील ज्ञानज्योती प्राणलिंग हे नाभिकमलातून द्वितीय असे शरीर धारण करून परशिवाचे समोर एकमूर्ति प्र्रगटून परशिवा पति बोलता झाला. हे शंभो! आपण मला कशासाठी निर्माण केले ? माझे काम काय आहे?

तेव्हा परशिवशंभूने सांगितले की‚ भ्रांतिमय जगामध्यें भ्रांत होऊन जन्म घेतलेले देव‚ दान‚ मानव‚ स्त्री‚ पुरूष हे सर्व लोक आपली मानमर्यादा सोडून विवस्त्र रूपाने असून भ्रांतीने संचार करीत आहेत. त्याकरितां तुम्ही अभ्रमेघाप्रमाणें हया सर्वांचे शरीर झाकण्यासाठीं वस्त्र निर्माण करावे. हया सर्व कामासाठी मी तुझ्या पाठीशी असून तुला साहय करतो. तू देवाचे अंगापासून झाल्यानें तुझे नांव 'देवांग' असे जगामध्ये प्रसिध्द राहील.

त्यानंतर देवांगाने त्यावेळ शंभुस्वरूप परमेश्वराचे आज्ञेप्रमाणें विष्णूच्या नभिकलापासून अमॄतबिंदू रूप षड्रंगाचे कापसाचे बी आणून जमिनीमध्ये पेरले. काही कालावधीनंतर कापसाचे बी उगवून त्यापासून कापुस निघाला त्यानंतर देवांगाने त्यातून सरकी बाजूस करून कोष्टी नामक किडयापासून लूता तंतूप्रमाणे बारीक सुत काढून विणण्यास सुरूवात केली. कापसापासून झालेली वस्तु म्हणजे कापड. तेच कापड पाहून परमेश्वराने खूष होऊन प्रथम आपली मर्यादा झाकण्यासाठी थोडे वस्त्र घेऊन स्वत:साठी लंगोटी नेसून घेतली. त्याचप्रमाणे देवांग निर्मित वस्त्र हे देव दान‚ सिध्द‚ साध्य‚ यक्ष‚ गंधर्व‚ किन्नर‚ किंपुरूष देवगण‚ मनू - मनी‚ ऋषी गण‚ अष्टदिक पालक व स्त्री-पुरूष सर्वानी नेसून घेतले. त्यानंतर जन्मलेल्या मुलाकरिता नार्भिनाल बांधण्यास सुत्र त्या देवांगानेच सर्वांना दिले.

हे देवांग अव्दितीय शंभू परमात्म्याचे शरिरापासून प्रगटल्याप्रमाणे व्दितीय त्यांना शंभू असे, त्रिलोकी प्राण्यांचा मान रक्षिल्याप्रमाणे मानांग असे, देवाचे नाभि कमलापासून उत्पन्न झाल्यामुळे नाभिज देवांग असे व कुसुम कादण्ड अशी नावे पडली.

त्यापुढे सप्तर्षीनी संतुष्ट होऊन देवांगाच्या वंश वॄद्यर्थ पुत्र कामेंष्टि यज्ञ केला. त्या यज्ञापासून सप्तकन्या उत्पन्न झाल्या. त्या नांवे प्रथम कन्या - यज्ञदत्ती, व्दितीय कन्या - देवदत्ती‚ तॄतीय कन्या - रत्नदंती‚ चतुर्थ कन्या - वीरदत्ती‚ पंचम कन्या - दुर्वांगी‚ षटकन्या - पलमंजरी‚ सप्तकन्या - मंगल कौशिकी अशी आहेत.

नंतर सप्तऋषीनी त्या सर्व मुलींचे देवांगाबरोबर लग्ने लाऊन दिली‚ त्यामुळे देवागांनी असे नांव पडले. पुढे देवांगाना त्यांच्यापासून संतान झाले. त्यांना देवांग मूनीने र्इश्वरांचे प्राणलिंग हेच इष्टलिंग म्हणून सांगून त्यांची पूजा करण्यास सांगितले. काही काळ लोटल्यानंतर देवांग घराण्यारील कित्येक लोक अज्ञानामुळे इष्टलींग सोडून वागू लागले. त्यामुळे शंभू देवांग मुनीने त्यांचेवर रागाने अग्निनेत्र सोडला त्यावेळ शंभू देवांगाची सहोदरी चौडेश्वरी (शांकरीदेवी) देवांगाजवळ येऊन म्हणाली "अण्णा! आपल्यापासून झालेल्या पुत्रावर कोपाग्नि सोडलांतर ते हे सर्व नाश पावतील. जगामध्ये जे जे प्राणी आहेत त्यांना आपापल्याप्रमाणे मिते. कॄपा करून आपण ताबडतोब शांत व्हा. नाहीतर थोड उशीर झाला तर आपल्या कोपग्नि नेत्राने सर्व जगाचा नाश होर्इल." अशा तर्हेने शांकरी देवीने देवांगास सांगितल्यावर देवांग शांत झाले. शंभूदेवांग शांत झाल्यानंतर देवांगाचे उग्ररूप एक, शांत रूप एक अशा दोन्ही नेत्रातून गण्ड भेरूण्ड पक्षी रूप होवून उडून गेला. तेव्हां देवांगाचे चिन्ह म्हणून गण्ड-भेरूण्ड कॄती ध्वज हे पटणावळ (पट्ट शाली) समाजापुढे रसाल ब्रम्ह क्षत्रिय वंशीय भाट घेऊन मिरवीत आले आहेत. देवांग मुनीचे प्रथम पत्नीचे पुत्रास पट्टशाली (पटणावळ) हे नाव पडले आहे. शंभू देवांगाच्या सात बायकापासून पुत्रसंतान म्हणजे पट्ट शाली‚ देवासाली (कोष्टी), समयसाली, शुभ्रसाली‚ नापिसाली (नाभिज), पज्ञसाली‚ तोगटीसाली होय. असे हे सप्त साली जगांत प्रसिध्द आहेत.

हे शंभू देवांग मुनीचे वंश अनादि कालापासून चालत आले आहेत. कॄतयुग‚ त्रेतायुग‚ व्दापार युग आणि कलियुग हे चार युगामध्यें देवांगाचा सातवा अवतार म्हणजे देवर दासमय्या होय. हे जि. गलबर्गा मु.मुदनूर गांवामध्ये जन्माला येऊन विणकाम (कायक) करीत. यांनी अनेक महत्वांच्या गोष्टी प्रसिध्द करून दाखविल्या आहेत. तसेच देवांग व्दितीय शंभू वंशातील पटणावळ समाजाचे मुख्य विणकाम आहे. बाकी अवतार ग्रथं विस्तार भयाने अनावश्यक म्हणून प्रकटले नाही.

पटणावळ (पट्ट शाली) समाजाचे कुलदैवत सालेश्वर कुलगुरू देवांग शंभू वीरशैव अष्टावरण षटस्थल पश्चासार असून एकोसत्तर शत स्थानिक ज्ञानाप्रमाणें १0१ बेडगर (गोत्र) आहेत. त्याकरिता सर्व लोकांस माहिती होण्याकरीता छापून प्रसिध्द केले आहेत. आणि मुख्यत: महाराष्ट्र‚ सातारा‚ क-हाड‚ नगर‚ भिंगार‚ फलटण‚ खेडेगांव‚ बारामती‚ लोणंद‚ पुणे सिटी‚ (नळ बाजार पाच मुखी मारूती जवळ लिंगायत समाज) मोहोळ ‚ बार्शी‚ लातूर‚ लोहार‚ किल्लरी‚ औसा‚ कळब‚ इंदापूर‚ नातेपूते‚ पाथर्डे‚ करमाळा‚ वैराग‚ सोलापूर या गावांच्या पटणावळ समाजास उपयोगी आहे.

संदर्भ : - श्री देवांग व्दितीय शंभू उत्पत्ती.